जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं आजच्या दिवशी २०१९ साली निधन झालं. विजू खोटे हे अभिनेत्री शुभा खोटे यांचे धाकटे बंधू होते. त्यांच्या वाहिनी म्हणजे दुर्गा खोटे या देखील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. यांना तुम्ही नावावरून नक्कीच ओळखणार नाही. दुर्गा खोटे म्हणजे मुघल-ए-आझम मधल्या जोधाबाई. आता आलं लक्षात ?
तर, विजू खोटे यांनाही बरेचजण नावावरून ओळखत नाहीत, पण शोले मधला कालिया म्हटलं की संपूर्ण सीन डोळ्यासमोर उभा राहतो. “सरदार मैने आपका नाम खया है” – हा त्यांचा डायलॉग अजरामर आहे.







