बॉलीवूडच्या गायक मंडळींना मराठीने आज पर्यंत अनेकदा भुरळ घातली आहे. आता हेच बघा ना, काही दिवसापूर्वी आलेला ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटासाठी तब्बल ५ बॉलीवूडच्या आघाडीच्या गायकांनी गाणी गायली होती. आपण जर आज पर्यंतच्या मराठी सुपरहिट गाण्यांकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की यात अनेक अमराठी आवाजांची गाणी सामील आहेत. यात अर्थातच शंकर महादेवन, सोनू निगम, मोहम्मद रफी आणि महेंद्र कपूर हे आघाडीवर आहेत.
मंडळी, आज आपण बघणार आहोत मराठी गाण्यांना आपल्या आवाजांनी बहार आणणारा अमराठी आवाज.




