पूर्वी नाव बदलून नावाच्या शेवटी कुमार लावण्याची एक लाट आली होती. ‘दिलीप कुमार’, ‘राजेंद्र कुमार’, ‘मनोज कुमार’, ‘अशोक कुमार’, ‘किशोर कुमार’ आणि बॉलीवूडचा कदाचित शेवटचा कुमार ‘अक्षय कुमार’. अशी काही प्रमुख नावे घेता येतील. सध्या हा ट्रेंड इतिहासजमा झाला असून एक नवीन ट्रेंड प्रसिद्ध होतोय. हा ट्रेंड म्हणजे नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल करणे. आता उदाहरणच घ्या ना, अजय देवगणने काही वर्षापूर्वीच आपल्या नावाचं स्पेलिंग Ajay Devgan वरून Ajay Devgn असं बदललं. आपल्या मराठमोळ्या रितेश देशमुखने पण Ritesh Deshmukh चं Riteish Deshmukh करून घेतलं.
मंडळी, बॉलीवूड मध्ये संख्याशास्त्रावरचा विश्वास वाढताना दिसतोय. वेगवेगळे संख्याशास्त्रज्ञ बॉलीवूड मध्ये यश मिळवून देण्यासाठी स्पेलिंग मध्ये बदल करण्याचे सुचवतात. आज आम्ही अशी १५ उदाहरणं घेऊन आलो आहोत. यातील काही स्टार्सना याचा फायदा झाला आहे तर काहीचं करियर कामायचं बसलंय.
चला तर बघूया ते कोणकोणते बडे स्टार्स आहेत ज्यांनी ‘सक्सेससाठी’ आपल्या नावाची स्पेलिंग बदलली.



















