मंडळी, चित्रपट क्षेत्रातील एक आव्हानात्मक काम म्हणजे ‘रंगभूषा’ . चित्रपटातील पात्र जेव्हा लेखकाच्या हातून घडवली जातात तेव्हा त्यांना खरं रूप देण्यात काम रंगभूषाकार बजावत असतो. अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला स्क्रिप्टच्या मागणीनुसार हुबेहूब तयार करण्याचं काम रंगभूषाकार करत असतो.

मंडळी आज रंगभूषाकाराबद्दल लिहिण्यामागचं कारण म्हणजे कालच संजू रिलीज झाला. संजू मधला रणबीरच्या अभियानाला समर्थ साथ दिली आहे ती रंगभूषेने. ही रंगभूषा साकारण्याचं शिवधनुष्य पेलणारे विक्रम गायकवाड यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

विक्रम गायकवाड यांनी तब्बल ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्याबद्दल काही सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या चित्रपटांची यादी बघा.





