सासू-सुनांच्या आणि सगळ्या खोटेपणावर आधारलेल्या मालिकांतून "दिल दोस्ती दुनियादारी"नं मराठी मालिकांना बाहेर आणलं असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या गावांतून आणि वेगवेगळ्या कारणांमुळं एकत्र आलेल्या या सहा तरूण-तरूणींची कथा सगळ्यांनाच आवडली होती. त्यामुळंच जेव्हा ही मालिका बंद झाली तेव्हा लोक हळहळले आणि पुन्हा एकदा "खुलता कळी.." सारख्या मालिकांवाचून दुसरा पर्याय उरला नाही.
मध्यंतरी याच लोकांनी ’अमर फोटो स्टुडिओ’ नावाचं एक भन्नात नाटक रंगभूमीवर आणलं आणि ते धमाल गाजतंय सुद्धा. तर आता ही मालिका १८फेब्रुवारीला त्यांच्या ’माजघरा’तून बाहेर येतेय. ऐकूनच मस्त वाटतंय ना? म्हणूनच गेल्या पर्वातल्या मालिकेदरम्यानची या कलाकारांच्या काही आठवणी..










