'पुणे तिथे काय उणे' ही म्हण किती खरी आहे हे पुणेकर वेळोवेळी सिद्ध करत असतात. आता पण एका अफलातून गोष्टीमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यात दहीहंडी गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दरवर्षी नवनवीन सेलेब्रिटी पुण्यात येत असतात. यावर्षी पण पुण्यात सेलेब्रिटी येतील पण यावेळचे आकर्षण थोडं वेगळे आहे राव!! मंडळी पुण्यात चक्क टिक टॉक फिल्म आयोजित करण्यात येत आहे. टिक टॉक वर आपल्या एक से बढ़कर एक विडिओंमुळे जे थेट तरुणाईच्या दिलात जाऊन बसले आहेत, असे टिक टॉक स्टार एकाच मंचावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
मंडळी, फक्त एवढयावरच थांबले असते तरी चालले असते, पण हे शेवटी पुणे आहे. जे होईल ते भन्नाटच होईल नाही का? तर या टिक टॉक स्टार्स सोबत तुम्हाला चक्क विडिओ करण्याची संधी मिळणार आहे राव!! रितसर स्पर्धा ठेवण्यात आली आहे, आणि जिंकलेल्या स्पर्धकांना मोठमोठी बक्षीसे पण जाहिर करण्यात आली आहेत.







