मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी ॲव्हेंजर्स एंडगेम पाहिला असेल. तब्बल २० सिनेमे आणि १० वर्षांचा प्रवास संपला. अनेकांना मार्व्हलच्या सिनेमांनी अक्षरशः वेड लावले होते. ३ तासांच्या शेवटच्या सिनेमाने अनेकांना रडू कोसळले. कित्येकांना हे संपूच नये असे वाटत होते. नाही का?
पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! मंडळी, 'आयर्न-मॅन'पासून सुरू झालेला प्रवास एंडगेमने संपला असला तरी येत्या काही काळात मार्व्हलचे तब्बल सात सिनेमे येत आहेत.
तर कोणकोणते सिनेमे येणाऱ्या काळात रिलीज होणार आहेत बघू या.











