या दिवशी होणार आहे ‘माऊली’ रिलीज....ही तारीख लक्षात ठेवा भौ !!

या दिवशी होणार आहे ‘माऊली’ रिलीज....ही तारीख लक्षात ठेवा भौ !!

३० एप्रिल रोजी माऊली सिनेमाचा पहिला लुक रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर काल आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. रितेश देशमुखने ट्विटरवरून ही तारीख जाहीर केली आहे.

तर, २१ डिसेंबर, २०१८ रोजी माऊली आपल्या भेटीला येणार आहे. तारीख जाहीर करताना जो पोस्टर रिलीज करण्यात आलाय तो सुद्धा तुमचं लक्ष वेधून घेईल. ‘माऊली’च्या सावलीत साक्षात विठ्ठल दिसतोय राव. त्यासोबतच माऊलीच्या समोर माणसांचा घोळका उभा आहे. या घोळक्याच्या हातात बंदुका असून त्या कधीही माऊलीचा वेध घेऊ शकतात. यावरून हे स्पष्टच आहे की यानंतर एक जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स होईल.

राव, आता तर उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स:

marathi moviemarathiBobhatamarathi news

संबंधित लेख