वेबसिरीज हे मनोरंजन उद्योगाचे केंद्र होऊ लागले आहे. प्रचंड प्रमाणात गुंतवणूक ह्या वेब सिरीज माध्यमात होऊ लागल्या आहेत. इथून पुढे हा उद्योग दहा वर्षांत किमान पाचपट वाढ दाखवणारा ठरू शकतो. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोसला ही अमेझॉन प्राइम सुरु करावं वाटलं. त्यावरूनच हे माध्यम किती महत्त्वाचं आहे स्पष्ट होतं आहे. भारताची भलीमोठी लोकसंख्या कोणत्याही विषयावर वेब कंटेंट येवो तो पाहणारे, आज करोडो प्रेक्षक तयार होत आहेत. भारतात झालेल्या इंटरनेट क्रांती आणि मुकेश अंबानीही ह्या वेबमार्केटमध्ये मोठी गुंतवणूक घेऊन येत असल्याने येत्या काळात हे क्षेत्र अतिशय आकर्षक क्षेत्र ठरत आहे.
ऑनलाइन जगात तुम्ही मुंबई-पुण्यात असा किंवा अगदी नंदुरबार, तुमच्याकडे वेबसिरियलसाठी उत्तम लिखाण करण्याची क्षमता असेल तर तुम्हाला प्रचंड मागणी आहे. आज अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत, कमीत कमी कलाकार घेऊन शूटिंग होत असल्याने कलाकारांच्या संधीही कमी होत आहेत, मात्र लेखकांकडे मात्र हीच परिस्थिती उलटी असून प्रचंड प्रमाणात त्यांचा लिखाणाला मागणी आहे.







