टोटल धमाल ट्रेलरचा मराठी स्पुफ बघितला का भाऊ....ओरिजिनल पेक्षा मराठी स्पुफ भारी आहे !!

लिस्टिकल
टोटल धमाल ट्रेलरचा मराठी स्पुफ बघितला का भाऊ....ओरिजिनल पेक्षा मराठी स्पुफ भारी आहे !!

टोटल धमालचा ट्रेलर पाहिला का राव ? काही लोकांना हा ट्रेलर डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनेलची डोक्युमेंट्री वाटत आहे. अहो का म्हणून काय विचारताय, सिनेमात जेवढे कलाकार आहेत त्यापेक्षा जास्त प्राणी भरलेत. तो माकड दिसतोय ना, तो चक्क हॉलीवूड वरून मागवलाय राव. असो.

आम्ही आज टोटल धमाल बद्दल का बोलतोय ? त्याचं काय आहे न भाऊ. टोटल धमालवाल्यांनी कोणी करण्याअगोदरच स्वतःचं स्वतःच्या ट्रेलरचा स्पुफ केला आहे. हा स्पुफ देखील वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे. परवाच पंजाबी स्पुफ आला आणि आता चक्क मराठी स्पुफ आला आहे.

मंडळी, खऱ्या ट्रेलरपेक्षा मराठी स्पुफ जास्त भारी आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे.  ट्रेलरची सुरुवात होते चितळ्यांच्या बाकरवडी पासून आणि शेवट होतो प्रसिद्ध वाक्याने – “मित्रच काढतो **** चित्र”.

आता तुम्हीच बघा हा ट्रेलर. आम्ही सगळं सांगितलं तर मज्जा स्पॉइल होईल ना भाऊ.

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख