गटारी स्पेशल: बॉलीवूडमधल्या सुप्रसिद्ध दारूबाज भूमिका

लिस्टिकल
गटारी स्पेशल: बॉलीवूडमधल्या सुप्रसिद्ध दारूबाज भूमिका

गटारी म्हटलं की दारू आणि मांसाहार आलाच. आपल्या हिंदी सिनेमात तर दारू आणि दारूडे दोन्हींनाही चांगलाच वाव मिळालाय. आज बोभाटा.कॉम घेऊन आलेय अशाच काही हिंदी सिनेमातल्या दारूबाजांची क्षणचित्रे.

 

केश्तो मुखर्जी

केश्तो मुखर्जी

हिंदी सिनेमातले दारूबाज म्हटलं की पहिलं नांव आठवतं ते केश्तो मुखर्जींचं. त्यांना कुठल्या सिनेमात न पिलेल्या अवस्थेत पाह्यल्याचं आठवायचं म्हटलं तर अवघड आहे..

धर्मेंद्र

धर्मेंद्र

शोलेमधला धर्मेंद्रचा दारू पिल्यानंतरचा "गॉंववालों...." हा डायलॉग पण तितकाच फेमस आहे. 

अमिताभ

मूंछें हो तो नत्थूलाल जैसी. 

मीनाकुमारी

मीनाकुमारी

मीनाकुमारीने खाजगी आयुष्यातही दारूला अधिक जवळ केल्याच्या बातम्या वाचायला मिळत. ते काही असो पण ’साहिब बीवी और गुलाम’मधला तिचा नवर्‍याला दारूपासून सोडवता सोडवता स्वत:च नशेच्या आहारी जाण्याचा अभिनय अतिशय वाखाणला गेला.

शाहरूख खान

शाहरूख खान

"कौन कंबख्त बर्दाश्त करनोको पीता है.. "

 

ये जवानी है दीवानी

ये जवानी है दीवानी

या सिनेमातल्या जवळजवळ प्रत्येक फ्रेममध्ये कुणी ना कुणी हातात दारूचा ग्लास घेऊन उभंच आहे. त्यामुळं कुणा एकाचं नांवच घ्यायला नको.

मोतीलाल

’जागते रहो’ मधलं सलील चौधरींचं  "ज़िंदगी ख्वाब है" हे गाणं मोतीलालजींनी अमर करून ठेवलंय.  दारू प्यायली की नाहीतरी तत्वज्ञान सुचतंच. हे गाणं त्याचं एक उदाहरणच, नाही का?

राजेश खन्ना

राजेश खन्ना

"पुष्पा, आय हेट टिअर्स रे..." 

जॉनी वॉकर

जॉनी वॉकर

केश्तो मुखर्जींपेक्षा थोडं कमी , पण जॉनी वॉकरसुद्धा त्यांच्या दारू पिऊन झिंगलेल्या रोल्ससाठी प्रसिद्ध होते.

राज कपूर

राज कपूर काही प्यायलेल्या भूमिकांसाठी प्रसिद्ध नसले तरी या गाण्याशिवाय आपल्या गाण्यांच्या भेंड्या कधी पूर्णच होत नाहीत. म्हणून या गाण्याचा व्हिडिओ पाहाच. हिरोच्या प्रेमिकेला उद्देशून आहे असं वाटणारं हे गाणं चक्क एका दारूच्या बाटलीसाठी म्हटलं जातंय. 

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख