“डोक्याची वाय झेड करू नकोस” हे वाक्य किंवा निदान “वाय झेड” हा शब्द तरी तुम्ही अनेकदा ऐकला असेल, बहुदा म्हटलंही असेल. वाय झेड हे कशासाठी वापरतात हे काही वेगळ सांगायला नको. बरं आज हा विषय काढून आम्ही तुमच्या डोक्याची का वाय झेड करतोय? सांगतो थांबा... लगेच मारायला उठू नका...
पहिली गोष्ट वाय झेड (YZ) नावाचा सिनेमा १२ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात सई ताम्हणकर आहे. पण (पण खूप महत्वाचा आहे) अंदर की बात अशी आहे की सई एका धार्मिक मुलीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. हे वाचून YZ वाटलं ? असो... सई ताम्हणकरसह या चित्रपटात पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे, सागर देशमुख या कलाकारांचाही समावेश आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. टीझरवरून तरी चित्रपटात नावाप्रमाणे काही तरी वाय झेड असणार असं दिसतंय.
सध्या नेहमीच्या बोली भाषेतल्या शब्दांवर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड आलेला दिसून येतोय. कारण काही आगामी चित्रपट असेच आहेत. “घंटा”, “दुनिया गेली तेल लावत”, “कच्चा लिंबू” इत्यादी. सहसा सभ्य या कॅटेगरीत न मोडणारे हे शब्द प्रेक्षकांना किती आवडतात हे भविष्यच ठरवेल. तूर्तास तुम्ही वाय झेडचा ट्रेलर बघा राव !!!




