सैराट नंतर नागराज अण्णाने थेट अमिताभ बच्चन यांना घेऊन हिंदीत पदार्पण करण्याचा घाट घातला आहे. या नवीन चित्रपटाचं नाव आहे ‘झुंड’. सध्या हा चित्रपट काही कारणांनी पुढे ढकलण्यात आला आहे. असं असलं तरी नागराज पुन्हा एकदा शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे.
या शॉर्ट फिल्मचं नाव आहे “पावसाचा निबंध”
“पावसाचा निबंध” मध्ये नक्की काय असणार आहे ? कथा काय आहे आणि कलाकार कोण असणार आहेत याबद्दल माहिती मिळालेली नाही. ही फिल्म येत्या १३ एप्रिल रोजी लॉस एंजेलिस येथील फ़िल्म फेस्टिवलमध्ये दाखवली जाणार आहे.
सैराट नंतर २ वर्षांनी नागराज मंजुळे आपल्याला नवीन काय दाखवतोय हे पाहण्यासारखं असेल.
आणखी वाचा :
नागराज मंजुळेची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ बघून घ्या लवकर !!
सैराटच्या हिंदी रिमेकचा पोस्टर आलाय भाऊ...करण जोहरचा ‘ड्रामा प्रोडक्शन’ बनवणार सिनेमा !!




