परवा सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन रिलीज झाला. या सीझनमधलं गुरुजी हे एक प्रमुख पात्र होतं. पहिल्या सीझनमध्ये आपण गुरुजीची झलक बघितली होती. या पर्वात मात्र गुरुजी संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहेता.
या पात्राला स्पेशल टच दिलाय अर्थातच पंकज त्रिपाठी या अफलातून कलाकाराने. त्याचबरोबर पात्रांच्या तोंडी असलेले संवाद पण तितकेच महत्वाचे आहेत. पण एक गोष्ट प्रेक्षकांनी नक्कीच बघितली असेल. ती गोष्ट म्हणजे गुरुजीचा आश्रम.







