आईबाबांनी सांगितलेल्या मुलीशी निमूटपणे लग्न करून संसार थाटणार्या पिढीतल्या पोरांचं जसं एक हवंहवंसं, पण शक्य न झालेलं 'कनेक्शन' असतंय, तशीच काही अवस्था दारु पिणार्यांची असते. त्यांचा घरोबा ब्लेंडर्स प्राइड किंवा मॅक्डॉवेल नंबर वनसोबत झालेला असला तरी पण त्यांचं जुनं फसलेलं अफेअर 'जॅक डॅनिअल्स' सोबत असतंय. आता दारु या विषयात फारसं गम्य नसलेल्या लोकांना त्यामागचा 'गम' कळणार नाही, पण 'जॅक डॅनिअल्स' ही अशी चीज आहे जी प्यायली नसेल त्यांना "हाय ! कमबख्ततूने पी ही नहीं" हा डायलॉग एकदम फिट्ट बसेल.
चला तर मंडळी, सध्याच्या ड्राय सिझनमध्ये फक्त 'जॅक डॅनिअल्स' च्या स्टोरीवर समाधान मानून घ्या आणि वाचा बोभाटाचा आजचा जॅक डॅनिअल्सचा स्पेशल एपिसोड !








