बिनधास्त सांगा मी YZ आहे! पण गजा...१२ ऑगस्टपर्यंत कंट्रोल हं ....

बिनधास्त सांगा मी YZ आहे! पण गजा...१२ ऑगस्टपर्यंत कंट्रोल हं ....

 वाय झेड म्हणजे काय ? वाय झेड म्हणजे आपलं स्वतःचं,म्हणजे एकदम असली म्हणजे अगदी आपल्या बेंबी इतकं  ओरिजीनल सर्कीट. जे आपल्यासाठी ओरिजीनल आणि दुसर्‍यांसाठी एकदम नल्ला असतं ते सर्कीट. जसे आपण मोठे होतो तसे आपण हे वाय झेड सर्कीट बंद करतो आणि दुसर्‍याच्या वाय झेडची कॉपी करायला जातो आणि मग लाईफचा एकदम लोच्या होतो. ही आहे १२ ऑगस्टला येणार्‍या समीर विद्वांस दिग्दर्शित ’वाय झेड’ या सिनेमाची मध्यवर्ती कल्पना. 


वाय झेडचा हिरो आहे गजानन उर्फ अबब (सागर देशमुख).  अबब एकदम गोंधळात पडलेला सज्जन आहे आणि  त्याचा इथे-तिथे पोपट होणं त्याच्या लाईफचा अविभाज्य भाग आहे. त्याचा या सिनेमातला अध्यात्मिक गुरु आहे बत्तीस (अक्षय टांकसाळे).  बत्तीसचे लाईफबद्दलचे फंडे एकदम क्लिअर आहेत.  त्या खेरीज नायिकेच्या म्हणजेच पर्णरेखेच्या भूमिकेत आहे सई ताम्हणकर.  म्हणजेच गजाननची जुनी मैत्रीण. फॉर अ चेंज-चक्क भरपूर कपड्यात गुंडाळलेली आहे.
या सिनेमाचे ट्रेलर बघितल्यावर  'तरुण तुर्क -म्हातारे अर्क' किंवा मिरासदारांच्या 'व्यंकूची शिकवणी'ची आठवण होते. असे असले तरी सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावर नेऊन ठेवल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मात्र १२ ऑगस्टपर्यंत  वाट बघावी लागणार आहे.  तोपर्यंत बघू या वायझेडचे ट्रेलर.

टॅग्स:

marathimovie

संबंधित लेख