मुतखड्याचा ज्यांना त्रास झाला आहे त्यांना हा आजार किती त्रासदायक असतो याची जाणीव असते. एखाद्या दिवशी असह्य त्रास होऊ नकोसे वाटते. एक मुतखडा देखील माणसाला अतिशय त्रास देऊ शकतो. त्यात त्याचा आकार थोडा जास्त असला म्हणजे अधिकचा त्रास. तेलंगणा येथे मात्र एक अजब किस्सा घडला आहे. एका व्यक्तीच्या शरीरात एक दोन नव्हे तर तब्बल २०६ खडे होते.
नालगोंडा जिल्ह्यातील ५६ वर्षीय विरामल्ला रमललक्षमैय्या यांची ही कहाणी. जवळपास सहा महिने त्यांना असह्य असा त्रास होत होता. त्यात उन्हाळ्यामुळे अधिकच भर पडली. जेव्हा ते डॉक्टरकडे गेले तेव्हा त्यांना विरामल्ला यांच्या शरीरात एकापेक्षा अधिक खडे असल्याचे समजले. टेस्ट केल्यावर त्यावर शिक्कामोर्तबच झाले.
विरामल्ला यांची मग समज घालण्यात आली आणि त्यांना ऑपरेशनसाठी तयार केले गेले. पण खडे काही एक दोन नव्हते. धोका मोठा होता, डॉक्टरांनी आपली संपूर्ण टीम तयार केली. हैदराबादच्या ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉ. पुला नवीन कुमार यांनी डॉ. वेणू मान्ने, डॉ. मोहन यांना सोबत घेतले.






