'रोगप्रतिकारशक्ती' हा शब्द गेले वर्षभर खूप वेळा तुम्ही ऐकलाच असेल. पण फक्त कोविडविरुद्ध ही रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे असे नाही, तर सर्व व्याधींविरोधात लढण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. ही शक्ती एक दोन दिवसांत तयार होत नाही, तर हळूहळू शरीरात ती निर्माण होत असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती फक्त खाण्यावर अवलंबून नसते तर तुमची जीवनशैली म्हणजे तुम्ही खात असलेले अन्नपदार्थ, झोप, व्यायाम, मानसिक आरोग्य यांवर देखील अवलंबून असते.
चांगली झोप, उत्तम आहार आणि व्यायाम या तीन गोष्टी रोगप्रतिकारकशक्ती समतोल राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असतात. आजच्या लेखातून आपण आहार या विषयावर बोलणार आहोत. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात असयलाच हवेत अशा ५ पदार्थांची यादीच आम्ही आणली आहे. चला तर पाहूया.









