तुम्हांला झोपेतून उठल्यावर पाठदुखीचा त्रास होत असेल, तर तुमच्या पाठीच्या कण्याची तुम्हांला काळजी घ्यायला हवीे, कदाचित त्याला हवा तसा नैसर्गिक आधार मिळत नाहीय.
तुमची गादी खूपच मऊ असेल, तर ती आधी बदला.
पाठीवर झोपणं हा या आजारावरही मुख्य उपाय आहे. पण झोपताना तुमच्या गुडघ्यांच्या खाली एक उशी घ्या. त्यामुळं होईल काय, की तुमच्या पाठीच्या कण्याला मूळचा नैसर्गिक बाक येईल आणि तुमच्या स्नायूंमध्ये येणारा ताण कमी होईल. एखाद्या छोट्याशा रूमालाची सुरळी करून तुम्ही माकडहाडापाशी ठेवलीत तर अधिक आराम मिळेल.
जर तुम्हांला कुशीवर झोपायची सवय असेल, आणि पाठीवर झोपणं जमत नसेल तर छातीशी पाय घेऊन अर्भकासारखं झोपा. यामुळंही पाठीला छानसा बाक येईल. तेव्हाही गुडघ्यांच्यामधेय एखादी पातळ उशी ठेवलीत तर पाठीला आणखी आराम मिळेल.