कोरोनाची दुसरी लाट चालू आहे, तिसरी येणार अशी चर्चा चालू आहे, त्यातच ती लाल-काळी-निळी बुरशी डोकं वर काढतेय. लस घेणं आणि ती ही लवकरात लवकर घेणं हाच आजच्या घडीला सगळ्यांच्या डोक्यातला विचार आहे. पण्....Cowin वर स्लॉट मिळत नाही आहेत!! एका सेकंदात सगळे स्लॉट गायब होत आहेत. १००० असोत वा ५००, नोटिफिकेशन येऊन सर्च करेपर्यंत सगळेच स्लॉट्स बूक होत आहेत. रोज Cowinवर जाऊन प्रयत्न करुन वैतागला असाल तर यावर आमच्याकडे काही उपाय आहेत. म्हणजे उपायांचे स्रोत आहेत. यातले काही उपाय बोभाटा टीमने वापरून बघितले आहेत, काही उपाय हे आमच्यापर्यंत पोहचले आहेत.
या उपायांकडे वळण्यापूर्वी आपण एकदा कोविनमध्ये नोंदणी करताना काय टप्पे आहेत ते बघूया.










