या लॉकडाउनमुळे या लोकांना काय झालंय ते कळनासं झालंय. एक साधा ‘लाॅकडाउनमध्ये किती खाता हा प्रश्न विचारल्यानंतर अनेक मनोरंजक उत्तरे मिळतात. आता तुम्हीच हे नमुने वाचा...
"जोपर्यंत वस्तू मिळत आहेत तोपर्यंत खाऊन घेऊ. पुढे वस्तू मिळेनाशा झाल्या तर मग उपास आहेच."
"कोरोना काही जाणार नाही. कोणाला केव्हा होईल ते सांगता येत नाही. त्यातून वाचू की नाही माहीत नाही.म्हणून आत्ताच काय ते खाऊन घेतो, उद्याचा काय भरवसा?"
"हल्ली मला चार्वाकाचे तत्वज्ञान पटलंय. यावत जीवेत सुखं जीवेत, आहे तोपर्यंत सुखात जगावं असं म्हणत रोज चविष्ट, चवदार पदार्थ बनवून खाऊन घेतो आहे."
"सध्या मी अशा दोन कुटुंबाना जेवण पुरवतो. ते माणशी जितके खातात तितकेच मी खातो."








