कोरोनाव्हायरसचं केंद्र असलेल्या चीनमधल्या बाजारात काय काय मिळतं पाहा...

लिस्टिकल
कोरोनाव्हायरसचं केंद्र असलेल्या चीनमधल्या बाजारात काय काय मिळतं पाहा...

सध्या कोरोनाव्हायरस हे नवीन संकट जगासमोर उभं राहिलं आहे. हा आजार अचानक कसा पसरला हे अजूनही गूढच आहे. याचं एक कारण म्हणजे हा आजार प्राण्यांचा आहे, मग तो माणसांमध्ये कसा पसरला असा प्रश्न पडतोच. या प्रश्नाचं उत्तर कदाचित या आजाराचं केंद्र असलेल्या चीनमधल्या बाजारात मिळेल. चला तर आणखी माहिती घेऊया.

चीनच्या वूहान येथील हुंआनान मासळी बाजारातून हा आजार पसरला आहे. या बाजाराला आम्ही मासळी बाजार म्हणत असलो तरी इथे हरतर्हेचे प्राणी अन्न म्हणून वाढले जातात. उदाहरणार्थ, लांडग्याची पिल्लं, वटवाघूळ, साप, कोल्हे, मगरी, सलाममेंडर (सरड्यासारखा प्राणी), उंदीर, कोअला, मोर इत्यादी. ही यादी मोठी आहे.

या बाजाराचा आकार हा अरुंद आहे आणि दुकानं एकमेकांना चिकटून आहेत. दुकानदार सगळ्यांसमोरच प्राण्यांची  कत्तल करून अन्न शिजवतात. हे करत असताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. कोरोनाव्हायरस याच निष्काळजीपणामुळे पसरला. सुरुवातीचे रुग्ण हे या भागातील विक्रेते आणि ग्राहक होते. वूहान वरून कोरोनाव्हायरसला वूहान वायरस नाव देण्यात आलं आहे.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख