एक काळ असा होता की भारतात आणि त्यामुळे सिनेमातसुद्धा सगळीकडे स्मगलर्स असायचे. सोने, चांदी, हिरे, अंमली पदार्थ यांच्या मोठ्या प्रमाणावर तस्करी चालत असे. आताही ती काही बंद झाली नाहीय, पण आताशा स्मगल होणाऱ्या वस्तू आणि स्मगलिंगच्या पद्धती बदलल्या आहेत. डीआरआय म्हणजे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स ही केंद्र सरकारी सरकारच्या अखत्यारीत येणारी संस्था देशात होणाऱ्या तस्करीला आळा घालत असते. अर्थात त्यांबद्दल वृत्तपत्रात येणार्या बातम्यांमधून आपण वाचत असतोच. सर्वसाधारणपणे सोने आणि मादक पदार्थांच्या तस्करीवर बारीक नजर ठेवणारी ही संस्था इतर प्रकारच्याही काही तस्करीवर आळा घालण्यासाठी गस्त घालत असते.
२०१९ च्या मार्च महिन्यात अशाच एका जगावेगळ्या तस्करीची कुणकुण डीआरआयला लागली होती. पार्थेबान दुराई या तस्कराला अर्थातच डीआरआय आपल्या पाळतीवर आहे याची कल्पना नव्हती.

(स्रोत)
पार्थेबान दुराई या तस्कराला अर्थातच डीआरआय आपल्या पाळतीवर आहे याची कल्पना नव्हती. मलेशियाहून येणार्या पार्थेबन दुराई मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा तो अत्यंत निर्धास्त होता. त्याने आणलेली वस्तू कस्टम अधिकार्यांच्या नजरेत भरणार नाही अशीच होती. त्याच्या बॅगेत एक धातूची थंडगार कुपी (कॅनिस्टर) होती. या कुपीचा आकारही फारसा मोठा नसल्याने आपण सहज कस्टमचा दरवाजा पार करू अशा भ्रमात असलेल्या पार्थेबन दुराईला जेव्हा डीआरआयच्या अधिकार्यांनी घेरले तेव्हा तो गांगरला आणि त्यानी ती कुपी डीआरआयच्या स्वाधीन केली.




