तुमच्या मोबाईलवर टच स्क्रिन लॉक हे फिचर असेल ना? म्हणजे फोन अनलॉक करताना एका ठराविक बोटाने स्क्रिनवर ठसा घेतला जातो आणि मगच फोन अनलॉक होतो. स्मार्टफोनच्या जगात हे फिचर सगळेच वापरत असतील. सुरक्षेसाठी हे चांगलेही आहे. प्रत्येकाचे बोटांचे ठसे हे वेगवेगळे असतात हेही तुम्ही ऐकलेच असेल. अगदी एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या बोटाचे ठसेही एकसारखे नसतात. पण कोणाच्या हाताला ठसेच नसतील तर? कसं शक्य आहे? अशक्य वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात शक्य झाली आहे.
चला तर आज एका अशा कुटुंबाची माहिती घेऊया जिथे मागच्या ३ पिढ्यांपासून पुरुषांच्या हातांवर ठसेच नाहीत.









