कोरोना संपायचे नाव घेत नसताना कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट लोकांचे टेन्शन वाढवत आहे. त्यातच आता पूर्णपणे नवा असा नोरोव्हायरस युकेत वाढत आहे. मे महिन्यापासून तर आजवर या व्हायरसचे तब्बल १५४ रुग्ण सापडले आहेत.
युके कोरोनापासून हळूहळू मुक्त होत असताना त्यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली होती. सर्वच प्रकारच्या वयोगटात या व्हायरसचा प्रसार होत आहे. नोरोव्हायरस हा अन्नामुळे होणाऱ्या अर्ध्याहून अधिक आजारांचे कारण ठरत आहे.
हा नोरोव्हायरस पोटाचा फ्ल्यू म्हणून ओळखला जात आहे. सिजनल फ्ल्यू, इन्फ्लुएन्झा व्हायरस, तसेच ज्या व्हायरसमुळे कोरोना होतो अशा कुठल्याही व्हायरसशी निगडित नाही. या व्हायरसला दिले जाणारे दुसरे नाव म्हणजे फूड पॉयजनिंग किंवा पोटजंतू. यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल ती म्हणजे अतिशय संसर्गजन्य असलेला हा व्हायरस पोट आणि अन्नाशी संबंधित आहे.






