कुठल्याही खेळात विजय हा सर्वात महत्त्वाचा असतो. विजय मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे खेळाडू आपण पाहत असतो. समोरचा खेळाडू केव्हा चूक करतोय आणि त्याचा आपण कसा फायदा उचलायचा याच्याच बेतात खेळाडू दिसतात. पण आज आम्ही अशा एका खेळाडूची गोष्ट सांगणार आहोत ज्याने समोरचा खेळाडू चुकला म्हणून विजेतेपद सोडत त्याला विजयीकेलं होतं.
२०१२ साली स्पेन येथे एक धावण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. स्पेनचा इव्हान फर्नांडिज आणि केनियाचा अबेल मुताई हे दोन्ही सर्वात पुढे धावत होते. हा सामना अबेल जिंकेल असे वाटत असतानाच त्याचा गैरसमज झाला. खरे तर अबेलला स्पॅनिश भाषा कळत नसल्याने त्याला फलकांवर लिहिलेली सूचना समजली नाही. त्याला वाटले की आपण जिंकलो आणि तो अंतिम रेषेच्या १० मीटर आधीच थांबला. आता इव्हानने ठरवले असते तर तो हा सामना जिंकू शकला असता.




