मित्रांनो, तुम्ही जगभरातली पेटिंग्स पाहत असाल. लोकांची प्रतिभा पाहुन थक्क व्हायला होते. एकाहुन एक सरस पेटिंग्ज जगाचे लक्ष वेधून घेत असतात. अनेक पेटिंग्ज तर इतकी हुबेहूब असतात की ती हाताने रंगवलेली पेटिंग्ज आहेत हेच लवकर समजत नाही. आता तर थ्री-डी पेंटिंगचा जमाना आला आहे. ही पेटिंग्ज लाखों रूपयांमध्ये विकली जातात हो मंडळी!!
माणसाने अश्मयुगात गुहेतल्या भिंतीवर काढलेल्या चित्रांपासून माणसाच्या चित्रकलेला सुरुवात झाली असली, तरी हा काही सगळ्यांचाच प्रांत नव्हे. पण ज्यांच्याहाती हे कसब आहे, ते सॉलीड महान लोक आहेत. त्यांची काही पेटिंग्स आहेत आख्ख्या जगात टॉपवर आहेत. अर्थात जगात असं होत असेल तर आपले भारतीय कसे मागे राहतील? खरेतर भारतातसुद्धा एकापेक्षा एक श्रेष्ठ चित्रकार होऊन गेले. राजा रवि वर्मा असतील किंवा आताचे एम एफ हुसेन, त्यांची चित्रे आजपण जगात प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, सध्या जग जरा दूर ठेवू आणि आज भारतातल्या काही प्रसिद्ध पेटिंग्जबद्दल आपण जाणून घेऊ...















