कितीहि निंदा किंवा वंदा, लोकांना ब्रिटिश राजघराण्याबद्दल जरा जास्तच कुतूहल असतं. मग त्यात केट-विल्यम किंवा डायना- चार्ल्स गॉसिप पासून राणी गेल्याची बातमी जगाला कशी कळवली जाईल असं सगळं येतं. यातूनच आम्ही घेऊन आलो आहोत ब्रिटिश राजघराण्याचे त्यांच्या नोकरांसंबंधीचे विचित्र नियम!!
राजघराण्यातील नोकरांना पाळावे लागणारे ११ विचित्र नियम...


१. महालाची स्वच्छता –
घराची साफसफाई करताना नोकरांनी दहा वाजण्यापूर्वी व्हॅक्युम क्लीनरचा वापर करायचा नाही. हा नियम वाचून तुम्हाला थोडे आश्चर्य नक्कीच वाटेल. पण, यामागचे खास कारण म्हणजे व्हॅक्युम क्लीनरच्या आवाजाने शाही घराण्यातील सदस्यांची झोपमोड होता कामा नये. म्हणून दहा पूर्वी साफसफाई करताना फक्त झाडूचाच वापर करायचा.

२. कार्पेटवरून चालण्याचा नियम –
जमीन किंवा जिन्यावर पसरलेली जी कार्पेट असते तिच्यावरून चालताना नोकरांनी कधीही मधल्या लाल पट्ट्यातून चालायचे नाही. त्यांनी नेहमी डाव्या किंवा उजव्या बाजूचाच वापर करायचा. कारण, कार्पेटच्या मधल्या लाल भागातून चालण्याचा मान फक्त शाही घराण्यातील व्यक्तींचाच असतो. शिवाय कार्पेटच्या मधल्या पट्ट्याचा वापर जर नोकरांनी केला तर त्यांच्या पायाचे ठसे त्यावर उमटू शकतात. म्हणून त्यांनी एका बाजूनेच चालावे.

३. कॉफी देण्याची पद्धत –
शाही लोकांना आनंदी राहायला आवडते. कॉफी हे एक त्यांच्या आनंदाचे मुख्य कारण, पण त्यांना कॉफी देताना ती कशी द्यायची याचेही नियम आहेत. त्यांना कॉफी फक्त चांदीच्या मग मधूनच दिली जाते. एक मोलकरीणगरमागरम कॉफी भांड्यातून चांदीच्या मग मध्ये ओतते. दुसरी मोलकरीण हातात ट्रे आणि कप घेऊन उभी असते. त्या ट्रेमध्ये हा जग ठेवला जातो. मग ती मोलकरीण शाही लोक जिथे बसले असतील तिथे ही कॉफी नेऊन देते, पण कॉफीसाठी चांदीचाच मग हवा.

४. त्यांच्या कामाचे नियोजन –
शाही घराण्यातील मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी नॅनी म्हणजे आया नेमलेली असते. या नॅनीचे काम फक्त मुलाचा सांभाळ करणे एवढेच नसते. तर त्याला केंव्हा कुठे फिरायला न्यायचे, कुठल्या कार्यक्रमाला न्यायचे आणि त्यासाठी शाही घराण्यातील लोकांनी कधी आणि किती वेळ द्यायचा याचे नियोजन करण्याचे कामही नॅनीकडेच असते. मुलांना आणि पालकांना एकत्र वेळ कसा घालवता येईल हेही तिनेच ठरवायचे.

५. केसांची निगा-
शाही घराण्यातील लोकांनी नेहमी टापटीपच राहिले पाहिजे. त्यांचे केस कुठल्याही वेळ नीटनेटके विंचरलेले किंबहुना स्टाईल केलेले असलेच पाहिजेत. म्हणून त्यांच्या हेअर ड्रेसरने नेहमी त्यांच्यासोबत राहिले पाहिजे. तुम्हाला माहितीये, केटने तिच्या बाळाला जन्म दिल्यादिल्या लगेचच तिचे केस नीट दिसतील याची काळजी घेण्यासाठी तिची हेअर ड्रेसर सोबतच होती.

६. नजरेस न पडण्याची काळजी घेणे –
शाही घराण्यातील नोकरचाकर नेहमीच या लोकांच्या आजूबाजूला हजर असतात. पण, कोणत्याही ठिकाणी त्यांच्यावर पटकन नजर जाईल अशा वेश त्यांनी परिधान करायचा नसतो. त्यांची वेशभूषा आजूबाजूच्या रंगसंगीतीत मिसळून जाणारी हवी. नीटनेटकी तर हवीच पण जास्त भडक किंवा उठावदार नसावी.

७. प्रिन्स चार्ल्स यांचा स्टाफ –
प्रिन्स चार्ल्स त्यांची वैयक्तिक कामे देखील नोकरांकरवीच करवून घेतात. जसे की त्यांचे कपडे म्हणजे अगदी उजव्या आणि डाव्या पायातील सॉक्स जिथल्या तिथे ठेवणे, टॉवेलची घडी उलगडून देणे, जेणेकरून त्यांना पटकन तो गुंडाळता येईल. इतकेच काय पण, त्यांच्या ब्रशवर पेस्ट लावून देण्याचे काम सुद्धा त्यांचे नोकरच करतात.

८. राणी एलिझाबेथची न्याहारी –
राणी एलिझाबेथ सकाळच्या न्याहारीत सिरील्स घेते. पण, हे सिरील्स तिला फक्त टपरवेअरच्याच बाऊलमधून सर्व्ह केले जातात. तिच्या मध्ये टपरवेअरच्या भांड्यातील पदार्थ जास्तवेळ फ्रेश राहातात. यासाठी इतर कुठल्याही प्रकारचा बाऊल तिला अजिबात आवडत नाही. तिला केलॉग्जचे स्पेशल सिरील्स जास्त आवडतात.

९. बाळाच्या लंगोटची घडी करणे-
नॅनीला बाळाच्या लंगोटची विशिष्ट प्रकारची घडी करता आलीच पाहिजे. खरे तर डायपर असताना शाही घरातील बाळे असे लंगोट कधी वापरतात हाही एक मोठा प्रश्न आहेच, पण तरीही बाळांच्या लंगोटची घडी कशाप्रकारे घातली जाते याची माहिती नॅनिला हवीच.

१०. नॅनिची वेशभूषा –
समारंभाच्या काळात नॅनीची वेशभूषा कशी असली पाहिजे याचेही काही विशिष्ट नियम आहेत. म्हणजे ख्रिसमस किंवा लग्नसमारंभात नॅनीने बाउलर हॅट, पांढरे हातमोजे आणि टॅन म्हणजे पिवळट तपकिरी रंगाचा ड्रेस घातला पाहिजे. अशा कपड्यातील व्यक्तींकडे इतरांचे सहज लक्ष जाते. असे कपडे त्यांनी फक्त विशेष समारंभातच घालायचे असतात. इतर वेळी त्यांनी त्यांचे नेहमीचे कपडे घातले तर चालतात. पण, हे कपडे सुद्धा शाही घराण्यातील इतर नोकरांच्या कपड्यांप्रमाणेच असतात.

११. शाही नोकरांची निवड कशी केली जाते –
शाही नोकरांची निवड करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये जे शाही नोकर होण्यास इच्छुक असतील अशा व्यक्तीला हॉल मध्ये बोलावले जाते. हॉलमधील कार्पेटवर कुठेतरी एखादा मेलेला झुरळ वगैरे आधीच पडलेला असतो. त्या व्यक्तीने संपूर्ण हॉलची पाहणी करून हा झुरळ शोधून हातानी फेकून द्यायचा असतो. बस्स इतकीच परीक्षा असते. एकदा का त्या व्यक्तीला तो मेलेला झुरळ सापडला की ती व्यक्ती शाही घराण्यात नोकर म्हणून तिचे स्वागत केले जाते.
तर हे होते शाही घराण्यातील नोकरांसाठीचे काही खास नियम. हे नियम वाचल्यावर किती विचित्र? असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल. शाही घराण्यातील लोकांमध्ये नोकर होऊन वावरणे म्हणजे किती मोठे दिव्य असते याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१