फक्त हॅरी आणि मेगन नाही, तर यापूर्वी या १२ लोकांनीही राजघराण्याचा त्याग केला आहे.

लिस्टिकल
फक्त हॅरी आणि मेगन नाही, तर यापूर्वी या १२ लोकांनीही राजघराण्याचा त्याग केला आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ब्रिटनच्या राजघराण्यातील वरिष्ठ पद सोडल्याची बातमी सध्या सगळीकडे आहे. दोघांनाही राजघराण्यातील जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हायचं आहे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे. यापुढे दोघेही काही काळ ब्रिटनमध्ये तर काही काळ कॅनडात राहतील. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या निर्णयाला ‘मेग्झीट’ नाव देण्यात आलं आहे.

राजघराण्यातील एखादी व्यक्ती आपलं पद सोडते ही घटना फार दुर्मिळ आहे. इतिहासात त्याची खास नोंद होते. अशाच  मोजक्या घटनांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

१. किंग एडवर्ड आठवा आणि वॉलिस सिम्पसन

१. किंग एडवर्ड आठवा आणि वॉलिस सिम्पसन

ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज नंतर याचा थोरला मुलगा एडवर्ड हा ब्रिटनचा राजा झाला. त्याचं वॉलिस सिम्पसन या अमेरिकन घटस्फोटीत महिलेशी प्रेम जडल्यावर ब्रिटनच्या इतिहासाला नवीन कलाटणी मिळाली. एडवर्डची या महिलेशी लग्न करण्याची इच्छा होती, पण राजघराण्यातील व्यक्तींपासून ते धर्मसंस्था ‘चर्च ऑफ इंग्लंड’ पर्यंत सगळ्यांनी या लग्नाचा विरोध केला.

अखेर १९३६ सालो एडवर्डने आपलं राजेपद सोडलं. राज्याभिषेकाच्या अवघ्या १ वर्षातच त्याने आपलं राजेपद सोडलं होतं. या घटनेबद्दल त्याने रेडीओवरील कार्यक्रमात काय म्हटलं पाहा : “मी ज्या स्त्रीवर प्रेम करतो तिच्या मदतीशिवाय आणि आधाराशिवाय एक राजा म्हणून असलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या निभावणं मला अशक्य झालं होतं.”

या घटनेने इतिहास बदलला. एडवर्ड नंतर त्याचा भाऊ सहाव्या जॉर्जचा राज्याभिषेक झाला. सध्या ब्रिटनच्या राणी असलेल्या एलिझाबेथ या याच सहाव्या जॉर्जच्या पुढच्या पिढीतील आहेत.

२. जपानच्या ४ राजकन्या

२. जपानच्या ४ राजकन्या

१. जपानचा राजा हिरोहितो याची मुलगी आत्सुको या २१ वर्षीय राजकन्येने ‘तकामास इकडा’ या डेअरी फार्मच्या मालकाशी लग्न केलं होतं. दोघांमध्ये ४ वर्षाचं अंतर होतं.

जपान मधल्या कायद्याप्रमाणे अशा परिस्थितीत राजकन्येला आपलं राज्यत्याग करावा लागतो. राजकुमाराला हा कायदा लागू पडत नाही. 

आत्सुकोने या कायद्यानुसार तकामासशी लग्न करण्यासाठी राजघरणं सोडलं. ऑक्टोबर १९५२ साली तिचा विवाह झाला. यावेळी राजघराण्यातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. गैरहजर फक्त राजा हिरोहितो होते. या लग्नाला त्यांचा विरोध नव्हता, पण त्या दिवशी त्यांना सर्दी झाली होती.

२. जपानचा राजा अकिहितो याची एकुलती एक मुलगी ‘राजकन्या सायको’ हिने २००५ साली राजघरणं सोडलं. तिला ‘योशिकी कुरोडा’ या मुलाशी लग्न करायचं होतं. राजघराण्यातील कोणालाही हा निर्णय मान्य नव्हता पण तिच्या निर्णयाचा मान राखून राजघराणं लग्नाला हजर राहिलं होतं.

३. २०१८ साली जपानचा प्रिन्स हिसाको याची मुलगी राजकन्या आयको हिने आपला राज्यत्याग केला होता. तिने एका शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या लग्नाला तसा कोणाचा विरोध नव्हता पण कायद्याचा मान राखून आयकोने राजघराणं सोडलं.

४. चौथ्या क्रमांकावर जी राजकन्या आहे तिने अजून राजघरणं सोडलेलं नाही पण लवकरच सोडणार आहे. राजकन्या माको हिने ‘की कोमुरो’ या सामान्य नागरिकाशी साखरपुडा उरकला आहे. २०२० वर्षात दोघेही लग्न करणार आहेत. ज्यावेळी लग्न होईल तेव्हा तिला आपले सर्व अधिकार सोडावे लागतील.

आम्ही ४ राजकन्यांबद्दल सांगितलं असलं तरी जपानच्या इतिहासात ८ राजकन्यांनी आपले सर्व अधिकार सोडले आहेत. लवकरच  राजकन्या माको हिचा ९ वा क्रमांक लागणार आहे.

३. स्वीडिश राजकन्या

३. स्वीडिश राजकन्या

१९४६ साली स्वीडनचा राजा कार्ल जॉन हा 'क्रीस्चीन विज्कमार्क' या महिला पत्रकाराच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्नेया आपले सगळे अधिकार आणि त्यासोबत येणारा पैसाही  सोडला. त्याच्यापूर्वी त्याच्या अंकलने १८८८ साली राज्यत्याग केला होता. १९३२ साली त्याच्या मावस भावाने राज्यत्याग केला होता.

४. प्रिन्स फ्रीसो आणि माबेल वीस स्मिथ

४. प्रिन्स फ्रीसो आणि माबेल वीस स्मिथ

नेदरलँड्सची राणी बेट्रीक्स यांचा मुलगा प्रिन्स फ्रीसो याने माबेल वीस स्मिथ या राजघराण्यातील बाहेरच्या व्यक्तीशी लग्न केल्याने त्याला राजघराण्यातून बाहेर पडावं लागलं. सोबत राजगादीवरील त्याचा हक्कही  गेला. लग्नानंतर दोघेही लंडनला गेले.

५. उबोलरत्न राजकन्या आणि पीटर लॅड जेन्सन

५. उबोलरत्न राजकन्या आणि पीटर लॅड जेन्सन

थायलंडची  राजकन्या उबोलरत्न ही १९७२ साली अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे  शिक्षणासाठी गेली होती. तिथे तिची भेट पीटर लॅड जेन्सन या अमेरिकन नागरिकाशी झाली. दोघेही प्रेमात पडले. लग्नानंतर उबोलरत्नला राज्यत्याग करावा लागला. ही प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही. १९९८ साली दोघांचाही घटस्फोट झाला.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख