उंदरांचं मंदिर, अवकाशातून दिसणारा कुंभमेळा- भारताबद्दलच्या या भन्नाट १३ गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?

लिस्टिकल
उंदरांचं मंदिर,  अवकाशातून दिसणारा कुंभमेळा- भारताबद्दलच्या या भन्नाट १३ गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?

उत्तरेला बर्फात गारठलेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला कच्छमधलं रणरणतं ऊन, दक्षिणेला हिरवागार कोकण  आणि सर्वात शेवटी पायथ्याशी हिंदी महासागर.. भारताला असं विविधतेचं देणं खूप लाभलंय. काही ठिकाणी अनुकूल तर काही ठिकाणी पराकोटीचं प्रतिकूल वातावरण आहे. अशा या भारतात काही आगळ्यावेगळ्या गोष्टीही तितक्याच भरल्यात. 

पाहा बरं यातल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

१. तरंगतं पोस्ट ऑफिस

१. तरंगतं पोस्ट ऑफिस

सुरूवात करू आपल्या देशाच्या स्वर्गापासून, काश्मिरमधल्या दल सरोवरात भारतीय पोस्ट खात्यानं आपली एक शाखा उघडलीय. हे अशा प्रकारचं एकमेव पोस्ट ऑफिस भारतात आहे. 

२. जगातील सर्वात जास्त उंचीवरचे क्रिकेट ग्राऊंड

२. जगातील सर्वात जास्त उंचीवरचे क्रिकेट ग्राऊंड

हिमाचल प्रदेशातल्या चाली मिलिटरी स्कूलसाठी  १८९३साली बांधलं गेलेलं चाली  या ठिकाणी असलेलं क्रिकेटचं ग्राऊंड हे समुद्रसपाटीपासून २४४४मीटर इतक्या उंचीवर आहे.  हे जगातलं सर्वाधिक उंचीवर असलेलं मैदान आहे. 

 

३. बांद्रा-वरळी सी लिंकच्या स्टीलच्या तारा पृथ्वीच्या परिघाइतक्या लांबीच्या आहेत

३. बांद्रा-वरळी सी लिंकच्या स्टीलच्या तारा पृथ्वीच्या परिघाइतक्या लांबीच्या आहेत

काय, आश्चर्य वाटलं ना? हे खरं आहे.  हा पूल बांधायला इतक्या स्टीलच्या सळ्या वापरल्या गेल्या आहेत की त्या एकत्र केल्या तर पृथ्वीच्या परीघाइतक्या होतात म्हणे.

४. सायकलवरून वाहून नेलेला उपग्रह

४. सायकलवरून वाहून नेलेला उपग्रह

थोडी हास्यास्पद गोष्ट खरी, पण गोष्ट खरीच आहे. भारताच्या इस्त्रोने बनवलेला पहिला उपग्रह वजनाने इतका हलका होता की तो थुंबाहून तिरूअनंतपुरमला सायकलवरून वाहून नेला.

५. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा इंग्रजी बोलणारा देश

५. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा इंग्रजी बोलणारा देश

विकीपिडियावरच्या माहितीनुसार अमेरिकेत सुमारे ३० कोटी लोक इंग्रजी बोलतात. तर भारतात त्या खालोखाल १२.५कोटी लोक इंग्रजी बोलतात. आधीच इतक्या भाषा भारतात आहेत, त्यात या जागतिक भाषेची आणखी एक भर. नाही का?

६. जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकांचा देश

६. जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकांचा देश

भारतात सुमारे ३०% लोक शुद्ध शाकाहारी आहेत. त्या खालोखाल इस्त्रायलमध्ये १३ आणि स्वीडनमध्ये १०% लोक शाकाहारी आहेत. इतर देशांत १०%हून कमी लोक शाकाहारी आहेत. चला, कुठे ना कुठे भारताचा जगात पहिला नंबर लागला म्हणायचा.

७. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा दुग्ध उत्पादन करणारा देश

इथंही पहिला क्रमांक अमेरिकेने पटकावलाय आणि भारत जगातल्या सर्वाधिक दुध उत्पादन करणार्‍या देशांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

८. अवकाशातून दिसणारा कुंभमेळा

८. अवकाशातून दिसणारा कुंभमेळा

कुंभमेळा हा बारा वर्षांतून एकदा भरतो. त्यावेळी बरीच जनता जमते. नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात १२ कोटी लोक सहभागी झाल्याची बातमी आहे. अर्थातच इतक्या लोकांची गर्दी अवकाशातूनही दिसून येते.

९. जगातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश

९. जगातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश

मेघालयातल्या खासी पर्वतरांगांमधला ’मौसीनराम’ हा जगातील सर्वाधिक पावसा़चा प्रदेश आहे. इथे वर्षाला सरासरी ४६७इंच पाऊस पडतो. इथे म्हणे वर्षभर छत्री घेऊनच घराबाहेर पडावे लागते.

१०. जागतिक कबड्डी जगज्जेता देश

१०. जागतिक कबड्डी जगज्जेता देश

भारताने आजवर कबड्डीमध्ये झालेल्या सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत. स्त्री आणि पुरूष या दो्नही गटांतले  अंतिम सामने भारतानेच जिंकले आहेत. या खेळात भारताला आजवर १० सुवर्णपदके मिळाली आहेत. उगीच नाही एकदम प्रो-कबड्डीला आजकाल इतका भाव मिळत आहे ते!!

११. स्वित्झर्लंडमध्ये ए. पी. जे कलामांच्या नांवे साजरा केला जातो सायन्स डे

११. स्वित्झर्लंडमध्ये ए. पी. जे कलामांच्या नांवे साजरा केला जातो सायन्स डे

राष्ट्रपती असताना डॉ. ए. पी. जे. कलामांनी स्वित्झर्लंडला भेट दिली होती. त्या निमित्ताने त्या देशाने २६मे हा दिवस सायन्स डे म्हणून जाहिर केला आणि तो आजतागायत साजरा केला जातो. 

१२. जगातली पहिली एअरमेल सर्व्हिस

१२. जगातली पहिली एअरमेल सर्व्हिस

पूर्वी हॉट एअर बलूनमधून पत्रं हवाईमार्गे पाठवण्याचे प्रकार झाले होते पण पत्रांचे गठ्ठे विमानानं पाठवण्याचा प्रयत्न कधी झाला नव्हता. जगाच्या इतिहासात असा पहिला प्रयोग करण्याचा मान भारतीय टपाल खात्याकडे जातो. १८ फेब्रुवारी १९११ या दिवशी सुमारे ६५००पत्रांनीअलाहाबाद ते नैनी असा ५ मैलांचा प्रवास केला. हे नैनी म्हणजे नैनीताल नव्हे तर उत्तरप्रदेशातलं अलाहाबाद जवळचं एक गांव आहे. हे विमान हेन्री पिकेट नावाच्या फ्रेंच पायलटने चालवले होते. 

हा अवघा तेरा मिनिटांचा प्रवास, पण त्याने एक इतिहास घडवला. 

१३. उंदरांचं मंदिर

१३. उंदरांचं मंदिर

बिकानेरजवळ एक करनी मातेचं मंदिर आहे. त्या मंदिराला उंदरांचं देऊळ पण म्हटलं जातं. कारण माहित आहे? त्या देवळात  जवळजवळ २०,०००हून अधिक उंदरं आहेत. करनी मातेचा अंश या उंदरात आहे असं तिथं मानलं जातं. मग काय, उंदरांची चंगळच चंगळ!!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख