विस्मृतीत गेलेल्या भारतातल्या १५ अफलातून दुचाक्या....यातल्या किती तुम्हाला आठवतात ?

लिस्टिकल
विस्मृतीत गेलेल्या भारतातल्या १५ अफलातून दुचाक्या....यातल्या किती तुम्हाला आठवतात ?

रॉयल एन्फिल्ड पासून ते यामाहा आरएक्स १०० पर्यंत अशा कितीतरी गाड्या आज विस्मृतीत गेल्या आहेत, ज्यांची कधीकाळी भारतीय रस्त्यावर धूम होती. आज आपण अशाच काही गाड्यांविषयी माहिती घेणार आहोत ज्यांना भारतीयांनी डोक्यावर घेतले पण आज त्या कुठेच दिसत नाहीत.

१) बजाज सनी

१) बजाज सनी

बजाज हे दुचाकी मोटार निर्मितीतील एक नामांकित नाव. बजाजने दुचाकी मध्ये आजवर अनेक मॉडेल्स बाजारात आणल्या. काळाप्रमाणे आपल्या प्रत्येक मॉडेल मध्ये त्यांनी काही बदल केले. ज्या मॉडेल जुन्या झाल्या त्यांना बाजारातून मागे घेतले. बजाजचे असेच एक मॉडेल म्हणजे बजाज सनी. वजनाने हलकी, हाताळायला सोपी असणारी ही बाईक कॉलेज तरूण-तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय होती. ६० सीसीचे इंजिन आणि तशी ५० किमी वेग असणारी ही बाईक नवशिक्या लोकांसाठी तर वरदानच होती. वजनाला हलकी असल्याने तिचा तोल सांभाळणे खूपच सोपे होते. म्हणूनच कॉलेज तरुण-तरुणी आणि नोकरी निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी ही बाईक एकदम परफेक्ट होती. पण, नंतर स्कूटरचा ट्रेंड मागे पडला आणि त्यासोबत बजाजची सनीही.

२) बजाज प्रिया

२) बजाज प्रिया

बजाज प्रिया हे बजाजचेच आणखी एक मॉडेल. बजाज प्रिया आणि बजाज 150 दोन्ही मॉडेल दिसायला एकसारख्याच होत्या. बजाजचा स्पर्धक वेस्पा 150शी साधर्म्य असणारी ही बाईक. 150 सीसीचे इंजिन असणाऱ्या या बाईकला थ्री-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन होते.

३) बजाज क्रिस्टल

३) बजाज क्रिस्टल

बजाज क्रिस्टल हाही बजाजचाच एक नवा प्रयोग. ही बाईकही वजनाला हलकी आणि खिशाला परवडणारी होती. या गाडीला ९४ सीसीचे इंजिन होते. स्कूटरलाच एक नवा आणि मॉडर्न लुक मिळाला होता.

४) बजाज एम 50

४) बजाज एम 50

बजाजचे पहिलेच स्टेप-थ्रू मॉडेल. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात ही स्कूटर चांगलीच लोकप्रिय होती. स्वस्त किमतीत मिळणारी, कमी इंधनावर चालणारी आणि अगदी दणकट अशी ही स्कूटर. अनेक मध्यमवर्गीयांसाठी एक उत्तम पर्याय ठरली.

५) बजाज एम 80

५) बजाज एम 80

एम 50चेच हे पुढचे मॉडेल. परंतु त्यापेक्षा थोडी अधिक दणकट होती. याला ७४.०८ सीसीचे मोटार बसवले होते. एम 50 पेक्षा ही गाडी अधिक मजबूत होती.

६) रॉयल एन्फिल्ड मिनी बुलेट

६) रॉयल एन्फिल्ड मिनी बुलेट

भारतातल्या घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे बुलेट. आर्चीची बुलेट वरची एन्ट्री बघितल्यानंतर तर मुलींमध्येही या गाडीची क्रेझ वाढते आहे. परंतु ही गाडी वजनाने अतिशय जड असल्याने सर्वांनाच ती नीट हाताळता येत नाही. म्हणून कंपनीने एक मिनी बुलेट बाजारात आणली होती. जी वजनाला थोडीशी हलकी होती. याला २००सीसीचे इंजिन होते. परंतु आज ही गाडी कुणी वापरताना दिसत नाही.

७) राजदूत जीटीएस

७) राजदूत जीटीएस

नव्वदीच्या काळात कॉलेज जीवन अनुभवलेल्या लोकांना राजदूतची जादू नवी नाही. त्याकाळात या गाडीने भरपूर लोकप्रियता मिळवली. विशेषत: बॉबी चित्रपटात ऋषी कपूरला ही गाडी चालवताना पाहिल्यानंतर तर तरुणांसाठी ही गाडी म्हणजे जीव की प्राण बनली होती. राजदूतनेही जीटीएस नावाचे एक मॉडेल आणले होते. ज्याचे इंजिन १७५ सीसीचे होते आणि त्याला डबल स्ट्रोक होता. पण, नंतर ही गाडी देखील विस्मृतीत गेली.

८) रॉयल एन्फिल्ड एक्सप्लोरर

८) रॉयल एन्फिल्ड एक्सप्लोरर

बुलेटचेच आणखी एक छोटे व्हर्जन. ज्याला ५० सीसीचे डबल स्ट्रोक इंजिन होते आणि त्यासोबत ३-स्पीड गिअर बॉक्स. जर्मनच्या झुंडॅप बाईक कंपनीसोबत मिळून या नव्या बाईकचे डिझाईन केले होते होते. पण, आज ही बाईकही बाजारातून गायब झाली आहे.

९) येज्दी ३५०

९) येज्दी ३५०

यामाहा ३५० ला टक्कर देण्यासाठी जावाने येज्दी ३५०चे मॉडेल बाजारात आणले. यालाही डबल स्ट्रोक इंजिन बसवण्यात आले होते. परंतु यामाहा ३५० च्या तुलनेत याला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. परिणामी गाडी बाजारातून मागे घ्यावी लागली.

१०) हिरो बीएमडब्ल्यू ६५०

१०) हिरो बीएमडब्ल्यू ६५०

भारतातील ही पहिलीच अॅडव्हेंचर बाईक म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच्या किमती मात्र सर्वसामन्यांच्या आवाक्या बाहेर होत्या. एका बाईकसाठी पाच लाख रुपये मोजायला लोकांना परवडणारे नव्हते. तरीही याची दणकट बॉडी, ड्युअल डिस्क ब्रेक, ६५२ सीसी इंजिन अशी कित्येक वैशिष्ट्ये होती ज्यासाठी याची किंमत रास्तच ठरत होती.

११) बजाज एसएक्स एन्ड्युरो

११) बजाज एसएक्स एन्ड्युरो

बजाजच्या कावासाकी आरटीझेड १०० बाजारातून गायब झाली तेव्हा कंपनीने एसएक्स एन्ड्युरो आणली. १०० सीसीचे इंजिन असणारी ही बाईकही आज विस्मरणात गेली आहे.

१२) रॉयल एन्फिल्ड फ्युरी

१२) रॉयल एन्फिल्ड फ्युरी

यामाहा आरएक्सच्या स्पर्धेत उतरवण्यासाठी या बाईकची निर्मिती करण्यात आली होती. १६३ सीसीचे बदल स्ट्रोक इंजिन आणि ५ स्पीड गिअरबॉक्स असलेली ही गाडी आज कुणाच्या लक्षातही नसले. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला हायड्रोलिक डिस्क ब्रेक होते.

१३) एलएमएल ग्रॅप्टॉर

१३) एलएमएल ग्रॅप्टॉर

लोहिया मशिनरी लिमिटेड म्हणजेच एलएमएल या कंपनीने ही मोटारसायकल आणली होती. बजाज पल्सर आणि ग्रॅप्टॉर यांच्यात जोरात स्पर्धा होती. या बाईकचे इंजिनही १५० सीसीचे होते आणि ५ स्पीड ट्रान्समिशन असलेली ही बाईक होती. पण, आज ही बाईक फारशी कोणाच्या लक्षात नाही.

१४) बजाज बॉक्सर १५०

१४) बजाज बॉक्सर १५०

बजाजने ही बाईक खास करून आफ्रिकन मार्केटचा विचार करून बनवली होती. भारतातल्या ग्रामीण भागात ही बाईक चालेल असा कंपनीचा कयास होता. पण, ही कल्पना तितकी यशस्वी ठरली नाही. परंतु बजाजच्या जितक्याही मॉडेल झाल्या त्यातील हे आजवरचे बेस्ट मॉडेल होते हे मात्र नक्की.

१५) सुझुकी बँडिट 1250S

१५) सुझुकी बँडिट 1250S

जपानची ऑटोमोबाइल कंपनी सुझुकीने ही स्पोर्ट बाईक भारतात आणली होती. परंतु याच्या भरमसाठ किमतीमुळे भारतात या बाईकला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या एका गाडीची किंमत सुमारे साडे आठ ते नऊ लाखाच्या घरात होती. याचे इंजिन एकदम दमदार होते. १२५५ सीसी इंजिन असलेली ही गाडी खरोखरच सुसाट पळत होती. म्हणूनच तर तिला गुंडांची बाईक म्हंटले जायचे. म्हणूनच फक्त धूम चित्रपटातच तिला जास्त लोकप्रियता मिळाली. पण, बाजारात याच्या भरमसाठ किमतीमुळे ही बाईक टिकू शकली नाही.

पूर्वी खूपच लोकप्रिय ठरलेल्या, ज्याची लोकांमध्ये चर्चा असायची पण, आज त्या बाईक किंवा मोटार सायकल कुठेही दिसत नाहीत, अशा गाड्या जर तुम्हालाही आठवत असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

 

लेखिका : मेघश्री श्रेष्ठी

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख