आम्ही आज ज्या कलाकृती दाखवणार आहोत त्या ५०० वर्षांपूर्वी नेदरलँड्सच्या फ्लँडर्स येथे तयार करण्यात आल्या होत्या. ही शिल्पं बॉक्स नावाच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेली असल्याने त्यांना बॉक्सवूड मिनिएचर म्हटलं जातं. बॉक्सवूड मिनिएचरचा मुख्य विषय हा ख्रिस्ती धर्मातील वेगवेगळे प्रसंग आणि बायबल मधल्या घटना दाखवणे हा होता.
ही कोरीव शिल्पं आजही लोकांना थक्क करतात. या शिल्पांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यात दडलेल्या रहस्याची उकल करण्यासाठी संशोधकांना चक्क मायक्रो-एसटी स्कॅनिंग आणि विश्लेषणासाठी अत्याधुनिक 3D सॉफ्टवेअर, तसेच एक्स-रे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागत आहे.










