विजय कर्णिक यांनी यावेळी हवाई तळ पुन्हा बांधायचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या सोबत वायुदलाचे ५० अधिकारी आणि सुरक्षा दलाचे ६० अधिकारी होते. एअरबेस बांधण्यासाठी ही संख्या फारच कमीच होती. त्यांनी मग असा काही निर्णय घेतला की त्यासाठी त्यांचं आजही कौतुक होतं.
त्यांनी आसपासच्या गावातून तब्बल ३०० स्त्रियांना या कामासाठी विचारलं. महत्वाचं म्हणजे त्या सगळ्या स्त्रियांनी निर्भयपणे कामासाठी होकार दिला. विजय कर्णिक यांनी त्यांना हल्ल्याची पूर्ण कल्पना दिली होती. हल्ला झालाच तर जीव कसा वाचवायचा याबद्दल मार्गदर्शनही केलं होतं. सुदैवाने अशी कोणतीच घटना घडली नाही. सगळ्या स्त्रिया सुरक्षित राहिल्या. त्यांनी दिवसरात्र एक करून काम वेळेत पूर्ण केलं. या कामगिरीमुळे वायू सेनेचं विमान सुरक्षितपणे भूज येथे उतरवण्यात यश आलं.