फोटो एडिटिंग किंवा आपण ज्याला ‘फोटोशॉप’ म्हणून ओळखतो ते आजकाल फारसं कठीण काम राहिलेलं नाही. त्यासाठी तुमच्याकडे ॲडोबी फोटोशॉपसारखं अॅप असायलाच हवं अशी अटही नसते. इंटरनेटवर अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला सोप्प्या पद्धतीने फोटो एडिटिंग करता येऊ शकतं. एवढंच नाही तर एडिटिंग मोफत आणि सहज करता येईल असे अॅप्सही उपलब्ध आहेत.
तर, एडिटिंगचं काम सोप्पं असलं तरी तुम्ही जर बरोबर वेळेत, अचूक जागा निवडून फोटो काढलेत, तर तुम्हाला फोटोशॉपची गरजच भासणार नाही. आजच्या लेखात आम्ही असे २० फोटो घेऊन आलो आहोत जे पूर्णपणे नैसर्गिकरीत्या घेण्यात आले असले तरी एडिट करून खास केल्यासारखे वाटतात.
चला तर सुरुवात करू.
























