काही कलाकारांना प्रत्येक गोष्टीत कला दिसते आणि ते कोणत्याही साध्या गोष्टीला एका अप्रतिम कलाकृतीत बदलू शकतात. उदाहरणासाठी आपल्या महाराष्ट्राच्या आबासाहेब शेवाळे यांच्या कलेकडेच पाहा ना. त्यांनी काही वर्षांपूर्वी १,४१,००० बुद्धिबळाच्या सोंगट्यांचा वापर करून धोनीचं मोझाक पोट्रेट साकारलं होतं. याबद्दल आम्ही सविस्तर आमच्या लेखातून तुम्हाला सांगितलं होतंच.
१,४१,००० बुद्धिबळाच्या सोंगट्यांनी साकारले महेंद्रसिंग धोनीचे मोझेक पोट्रेट....
आज हा विषय काढण्याचं निमित्त असं की जगभरातील अशाच भन्नाट कलाकारांच्या भन्नाट कलाकृती आमच्या हाती लागल्या आहेत. कोणी टायरपासून मूर्ती तयार केली आहे, तर कोणी चक्क ब्रेडवर चित्र साकारलं आहे. तुम्हाला कोणती कलाकृती आवडते पाहा बरं.

















