मंडळी, ‘यूनिफाइड पेमेंट इंटरफेस’ म्हणजेच युपीआयचं नवीन व्हर्जन ‘युपीआय २.०’ लाँच करण्यात आलं आहे. युपीआय २.० व्हर्जनची वैशिष्ट्ये काय असतील ते आपण आज बघणार आहोत. पण त्या आधी युपीआयबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
युपीआय ही ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी सर्वात सोप्पी सुविधा आहे. युपीआयमुळे तत्काळ पैसे पाठवताही येतात व पैसे घेताही येतात. या व्यवहाराची खासियत म्हणजे पैसे ट्रान्स्फर करताना लाभार्थीला त्याचं बँके अकाऊन्ट नंबर किंवा बँकेचे नाव द्यावे लागत नाही. युपीआयचा वापर करून एकावेळी कमीतकमी ५० रुपयांपासून ते जास्तीतजास्त १ लाख पर्यंतचा व्यवहार करता येतो. युपीआय २.० मध्ये तर ही मर्यादा २ लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सर्व प्रकारच्या कॅशलेस व्यवहारांसाठी सरकारतर्फे या अॅपची निर्मिती करण्यात आली होती. २०१६ मध्ये पहिल्यांदा युपीआयचा अॅप लाँच झाल्यानंतर बघताबघता युपीआय लोकांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. नवीन व्हर्जनची बऱ्याच दिवसापासून वाट बघितली जात होती आणि तो शेवटी लाँच झालाच.
चला तर आता बघूया या नवीन व्हर्जन मध्ये कोणते नवीन फिचर असतील ते....




