गॅस गिझर वापरताना करायचे ५ महत्त्वाचे सुरक्षा उपाय !!

लिस्टिकल
गॅस गिझर वापरताना करायचे ५ महत्त्वाचे सुरक्षा उपाय !!

इलेक्ट्रिक गिझर महाग असतो म्हणून लोक गॅस गिझरची निवड करतात, पण गॅस गिझरच्या वापराबद्दल महत्त्वाच्या गोष्टींकडे कोणाचच लक्ष जात नाही. ५ जानेवारी २०२० रोजी मुंबईच्या बोरीवलीमधली ही घटना पाहा.

ध्रुवी गोहिल ही ५ तारखेला सकाळी अंघोळीला गेली होती. तिला बाहेर यायला उशीर झाल्यावर तिच्या घरच्यांनी बाथरूमचं दार ठोठावलं. तिच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. शेवटी घरच्यांनी  दार तोडलं. ध्रुवी श्वास कोंडल्याने बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडली होती. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिचा जीव वाचला नाही. १० जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना घडली गॅस गिझरमुळे. गॅस गिझरमध्ये असलेला कार्बन मोनोक्साईड वायू संपूर्ण बाथरूममध्ये पसरला असल्याने तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. परिणामी अपुऱ्या ऑक्सिजनमुळे धृवीला भोवळ आली.

आज यानिमित्ताने आपण अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून  गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत.

आज यानिमित्ताने आपण अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून  गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत.

१. गॅस गळती होत आहे का यावर लक्ष ठेवा. गॅस गिझरमध्ये असलेल्या नैसर्गिक  वायूचा सडलेल्या अंड्यासारखा वास येतो. याप्रकारचा वास येत असेल तर तत्काळ मदत घ्या.

२. गॅस गिझर जर बिघडलेला असेल तर नैसर्गिक वायूचं ज्वलन अर्धवट होतं. परिणामी कार्बन मोनोक्साईड हा विषारी वायू तयार होतो.

३. बंद जागेत गॅस गिझर लावू नका. महानगर आणि इतर अधिकृत गॅस गिझर विक्रेतेपण गॅस गिझर बाथरूममध्ये लावायला मनाई करतात. त्यांच्या मते तो मोकळ्या जागेत लावायला हवा, जेणेकरून तयार कार्बन मोनोक्साईड वातावरणात मिसळून जाईल. पण सोयीच्या आणि घराच्या शोभिवंतपणाच्या दृष्टीने आपण तो बाथरूममध्येच लावून घेतो. परिणामी घरातल्या माणसांच्या जीवावर बेतू शकतं. (वरती नमूद केलेल्या घटनेत अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती.)

४. गिझर जिथे आहे त्या जागी एक्झॉस्ट फॅन लावा. एक्झॉस्ट फॅनमुळे कार्बन मोनोक्साईड उत्सर्जित झालाच तर तो बाहेर फेकला जाईल.

४. वायू गळतीला वेगवेगळी करणं असू शकतात. काहीवेळा तुम्हाला पत्ताही लागत नाही. म्हणून नियमितपणे गॅस गिझर तपासून घ्या.

५. गॅस गिझरचा सतत वापर करू नका. थोड्याथोड्या वेळासाठी गिझर बंद करून मग पुन्हा वापर करा. सततच्या वापरामुळे गिझर बिघडून स्फोटही होऊ शकतो.  

 

तर, तुमच्या घरात गॅस गिझर असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. थोड्याशा सतर्कतेतून एक मोठा अपघात टळू शकतो.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख