वयाचा आणि हुशारीचा फारसा संबंध नसतो हे या लहान मुलाने सिद्ध केले आहे. ओडिशा येथील बालनगीरला राहणारा ७ वर्षांचा वेंकट रमण पटनायक याने मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी असोसिएट नावाची परीक्षा पास केली आहे. जागतिक स्तरावरील असलेली ही परीक्षा अनेक वर्ष टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेल्यांना देखील पास करता येत नाही, ते त्याने वयाच्या ७व्या वर्षीच करून दाखवले आहे.
ही अशी परीक्षा असते जी पास करता करता अनेकांच्या डोक्याचे केस गळतात, पण या लहानग्याने एखाद्या स्कॉलरशिपची परिक्षा पास करावी या थाटात ही परीक्षा पास करून दाखवली आहे. वेंकट तिसरीत शिकतो. त्याने जावस्क्रीप्ट, पायथॉन, एचटीएमएल, सिएसएस आणि डाटाबेस एडमिनीस्ट्रेशन यांच्यासाठी गरजेची असलेली एमटीए परीक्षा पास करून दाखवली आहे.







