मिग विमानांचे ९ दुर्दैवी अपघात, यातून आपलं वायुदल काही शिकेल का ?

लिस्टिकल
मिग विमानांचे ९ दुर्दैवी अपघात, यातून आपलं वायुदल काही शिकेल का ?

रंग दे बसंती सिनेमाचं कथानक हे भारतीय वायू सेनेतील अधिकाऱ्याभोवती फिरतं. जुनाट तंत्रज्ञान आणि खराब जेटमुळे अजय सिंग राठोड (आर. माधवन) या फ्लाइट लेफ्टनंटचा विमान अपघात मृत्यू होतो. अशीच काहीशी घटना नुकतीच बंगलोर येथे घडली. भारतीय वायुसेनेतील Mirage 2000 हे विमान बंगलोर येथे कोसळलं. २ पायलटांचा यात जीव गेला. दोघेही नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करत होते.

मंडळी, वायू सेनेच्या आजवरच्या इतिहासाकडे एकदा नजर टाकली की समजतं असे प्रकार या पूर्वीही घडले आहेत. अशा प्रकारचे आजवर ९ अपघात घडले आहेत. या सगळ्या अपघातांच्या मागे खराब तंत्रज्ञान हे एक प्रमुख कारण होतं.

चला तर आज या ९ दुर्दैवी घटनांबद्दल जाणून घेऊया.

१. जलंधर येथे MiG-21 विमानाचा अपघात – ३ मे, २००२

१. जलंधर येथे MiG-21 विमानाचा अपघात – ३ मे, २००२

जलंधर येथे २००२ साली वायू सेनेचं MiG-21 हे विमान कोसळलं आणि ८ नागरिकांचा जीव गेला. सुदैवाने पायलट वेळीच विमानातून बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला होता. या अपघातात आणखी १७ लोक जखमी झाले होते.

२. MiG-21 फायटर जेटचा जम्मू काश्मीर येथील अपघात – २२ मे, २००७

२. MiG-21 फायटर जेटचा जम्मू काश्मीर येथील अपघात – २२ मे, २००७

रोजच्या प्रशिक्षणासाठी हे विमान उधमपूर येथून निघाले होते, पण मध्येच विमानाचा संपर्क तुटला. या अपघातात दोन्ही पायलटांचा पत्ताच लागला नाही.

३. MiG-21 चा राजस्थानच्या बार्मर जिल्ह्यातील अपघात – १५ जुलै, २०१३

३. MiG-21 चा राजस्थानच्या बार्मर जिल्ह्यातील अपघात – १५ जुलै, २०१३

या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कोणत्याही सामान्य नागरिकाला इजा पोहोचली नाही.

४. MiG-21 जेट चा जम्मू काश्मीर येथील अपघात – २७ मे, २०१४

४. MiG-21 जेट चा जम्मू काश्मीर येथील अपघात – २७ मे, २०१४

MiG-21 जेटचा हा २०१४ चा अपघात होता. या अपघातात सामान्य नागरिकांचा जीव जाऊ नये म्हणून वायू सेनेच्या पायलटने विमानाला लोकवस्ती पासून लांब नेलं होतं. पण या प्रयत्नात त्याचा स्वतःचा जीव गेला.

५. MiG-21 जेटचा जम्मू काश्मीर येथील अपघात – २४ ऑगस्ट, २०१५

५. MiG-21 जेटचा जम्मू काश्मीर येथील अपघात – २४ ऑगस्ट, २०१५

२०१४ च्या अपघातानंतर पुढच्याच वर्षी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर भागात MiG-21 फायटर जेटचा अपघात झाला. या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही.

६. MiG-27 जेटचा पश्चिम बंगाल मधला अपघात – ८ मे, २०१५

६. MiG-27 जेटचा पश्चिम बंगाल मधला अपघात – ८ मे, २०१५

हा अपघात अवघ्या १० मिनिटात घडला. विमानाच्या उड्डाणानंतर १० मिनिटात विमान कोसळलं. २ नागरिक मारले गेले, पायलट सुखरूप बाहेर निघाला.

७. MiG-21 जेटचा जामनगर शहरातील अपघात – जानेवारी ३१, २०१५

७. MiG-21 जेटचा जामनगर शहरातील अपघात – जानेवारी ३१, २०१५

या अपघाताने जीवितहानी झाली नाही पण मॅंग्रोवच्या जंगलाचं नुकसान झालं होतं.

८. जोधपुर येथे MiG-27 विमानाचाचा अपघात – ४ सप्टेंबर, २०१८

८. जोधपुर येथे MiG-27 विमानाचाचा अपघात – ४ सप्टेंबर, २०१८

जोधपुरच्या बानाड भागात MiG-27 रोजच्या फेरीवर असताना विमानात बिघाड झाला आणि विमान कोसळले. पायलटांनी या प्रसंगातही विमान लोकवस्तीच्या भागात कोसळू न देण्याचे आटोकाट प्रयत्न केले. सुदैवाने दोघाही पायलटांचा जीव वाचला.  

९. फायटर जेट MiG-21 चा कांगरा, हिमाचलप्रदेश येथे झालेला अपघात – १८ जुलै, २०१८

९. फायटर जेट MiG-21 चा कांगरा, हिमाचलप्रदेश येथे झालेला अपघात – १८ जुलै, २०१८

ही घटना देखील २०१८ सालची. पठाणकोट येथून फायटर जेट MiG-21 हिमाचल भागात जात असतानाच मध्येच विमानात बिघाड होऊन विमान कोसळले. वैमानिकाला हकनाक जीव गमवावा लागला.

मंडळी, या ९ अपघातांमध्ये आपण काही धडा घेतला आहे असं तुम्हाला वाटतं का ? तुमचं मत द्या !!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख