एका शेतकऱ्याचा बैलगाडी ते मर्सिडिजपर्यंतचा प्रवास...वाचा एक प्रेरणादायी कहाणी !!

एका शेतकऱ्याचा बैलगाडी ते मर्सिडिजपर्यंतचा प्रवास...वाचा एक प्रेरणादायी कहाणी !!

मंडळी स्वप्न बघण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. चेन्नईच्या एका शेतकऱ्याने हेच सिद्ध करून दाखवलंय. वयाच्या ८ व्या वर्षी बघितलेलं स्वप्न त्यांनी अखेरी वयाच्या ८८ व्या वर्षी पूर्ण केलं. 

मंडळी, चेन्नईच्या देवराजन यांनी वयाच्या ८ व्या वर्षी एक कार पाहिली होती. ती एक मर्सिडिज कार होती. पण त्या वयात त्यांच्यासाठी तरी ती फक्त एक कारच होती. या कारच्या पुढे असलेली चांदणी तेवढी त्यांच्या लक्षात राहिली.

स्रोत

पाहताक्षणीच देवराजन यांनी ठरवलं की मोठं झाल्यावर आपणही अशीच कार विकत घेऊ. राव, एका सामान्य शेतकऱ्याने बघितलेलं एवढं मोठं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ तर लागणारच ना. हा क्षण यायला तब्बल ८० वर्ष जावी लागली. आज देवराजन हे वयाच्या ८८ व्या वर्षी मर्सिडिज बेंझ बी-क्लास कारचे मालक आहेत.

देवराजन यांच्या स्वप्नाबद्दल माहित पडताच चेन्नईच्या मर्सिडिज शो-रूममध्ये या क्षणाला आणखी यादगार करण्यासाठी खास तयारी करण्यात आली. देवराजन यांच्या हातून केक कापण्यात आला आणि हे सर्व कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. मर्सिडिजने या क्षणाचा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला आहे. 

मंडळी, स्वप्न पहा आणि धैर्य ठेवा, स्वप्न नक्की पूर्ण होतील. हेच देवराजन यांच्या गोष्टीतून सिद्ध होतं.

टॅग्स:

marathiBobhatamarathi newsmarathi infotainment

संबंधित लेख