मंडळी, आपल्या प्रत्येकालाच वाईट सवयी असतात. आता वाईट सवयीत दारू, सिगारेटसारखी व्यसनं तर येतातच, पण पैसे उधळणे, पोट सुटेपर्यंत खात बसणे, नखं खाणे, आळस करणे अशा सवयी पण येतात. या सवयी वाईट आहेत हे माहित असूनही आपण त्यांना चिकटून असतो. प्रेमातच बुडालेलो म्हणा ना. नखं खाणारी मुलगी तर प्रत्येकाच्याच ओळखीत असते.
तर, अमेरिकेच्या बिहेवियरल टेक्नोलॉजी या कंपनीने तुमच्या वाईट सवयी घालवण्यासाठी तुम्हाला मदत करायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी एक असं ब्रेसलेट तयार केलं आहे जे तुम्हाला वेळोवेळी शॉक देत राहील. असा तसा नाही तर चांगला ३५० वोल्टचा शॉक राव.







