सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक किती प्रयत्न करतात हे सांगण्याची गरज नाही. मागे विष्णुप्रिया नावाच्या टिकटॉक स्टारच्या घराबाहेर तिच्यासोबत टिकटॉक बनवता यावा म्हणून हजारो मुलं गोळा झाले होते. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी जे करता येईल तर सर्व आता लोक ट्राय करून पाहत आहेत. रोजच्या रोज नवनविन गोष्टी करून लोकांचे ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न ही मुले करत असतात. पण आता तर मुलं जीवासोबत खेळायला लागले राव!!
व्हिडीओ व्हायरल व्हावा म्हणून त्याने असं काय केलं की पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या ?


थिरूअनंतपुरमच्या रामी रेड्डी या विद्यार्थ्याने चक्क रेल्वे ट्रॅकवर सिलिंडर ठेऊन रेल्वे येत असताना व्हिडिओ बनवला आहे. हा रामीरेड्डी बी. टेक.चा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. याआधी पण या भावाने रेल्वे ट्रॅकवर टायर बाईक आणि फटाके ठेऊन व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ चांगलाच वायरल झाल्याने त्याला ही नविन आयडीया सुचली.
अर्थातच, या विद्यार्थ्याला आरपीएफने अटक केले आहे. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामीरेड्डीने रेल्वे ट्रॅकवर भाजीपाला, फळे, चिकनचे पीस, खेळणी, फटाके, सायकल चेन अशा गोष्टी पसरल्या होत्या. नंतर रेल्वे येत असताना त्याने व्हिडिओ बनवला. त्याच्या युट्यूब चॅनलला चांगले व्ह्यूज यावेत आणि सबस्क्रायबर वाढावेत म्हणून त्याने एवढा खटाटोप केला होता.

रामीरेड्डीने आतापर्यंत त्याच्या युट्यूब चॅनेलवर ४७ विडिओ अपलोड केले आहेत, त्यापैकी ४३ विडिओ करताना त्याने असल्या आगाऊ आणि प्राणघातक गोष्टी केल्या आहेत.
त्याच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी येऊनपण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता, शेवटी हा व्हिडीओत वापरलेल्या मोटार सायकलच्या नंबर प्लेटच्या लायसेन्सवरून त्याचा ठिकाणा पोलिसांनी शोधला.

फेमस होण्याचा क्रेझ कमी तर होत नाही, पण दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे सोशल मीडियाचा चांगला वापर करून काही मुलं कमी वयात श्रीमंत होत आहेत, तर काही असे जीवघेणे खेळ करत आहेत.
मंडळी, तो व्हिडिओ बनवत असताना गॅस सिलिंडरचा जर स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती. तुम्हांला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं?
लेखक : वैभव पाटील
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१