कलाकारांना नवीन कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून इन्स्टाग्रामवर #100DayProject हा हॅशटग सध्या ट्रेंड होतोय. #100DayProject म्हणजे कलाकारांनी त्यांच्या कोणत्याही आवडत्या विषयावर सलग १०० दिवस काम करायचं आणि ते फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करायचे. हा हॅशटग वापरून कोणीही आपली कला इन्स्टाग्रामवर सादर करू शकतो.
एकेकाळच्या कॉर्पोरेट वकील असलेल्या शिखा नंबियार यांनी हा चॅलेंज स्वीकारला होता. त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता #100DaysOfBangaloreByChica. बंगलोर शहरातील १०० ठिकाणं त्यांनी आपल्या चित्रातून मांडली होती.

























