अभिजात सौंदर्य लाभलेला प्रदेश म्हणून काश्मीरची ओळख आहे. काश्मीरला "पृथ्वीवरील स्वर्ग" म्हणून ओळखतात.
"अगर फिरदौस बा रुए ज़मीन अस्त,
हमीं अस्त-ए हमीं अस्त-ए हमीं अस्त-ए।"
या शब्दांत काश्मीरचं वर्णन केलं जातं.
तुम्ही कोरोनानंतर जर एखाद्या ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर काश्मीरसारखं ठिकाण नसेल. तिथं गेल्यावर इतरत्र कुठे न दिसणारी एक गोष्ट तुम्हांला तिथेच पाहायला मिळेल. काश्मिरच्याच प्रसिद्ध दल सारोवरात आहे भारतातली एकमेव तरंगती भाजी मंडई! चला तर मग जाणून घेऊया या भाजी मंडईबद्दल...















