पिझ्झा डिलिव्हरी झाली नाही म्हणून फोन केला आणि ९५,००० रुपये गमावले? काय आहे प्रकरण?

लिस्टिकल
पिझ्झा डिलिव्हरी झाली नाही म्हणून फोन केला आणि ९५,००० रुपये गमावले? काय आहे प्रकरण?

ऑनलाईन शॉपिंग करताना फार काळजी घ्यावी लागते. तुमचे बँक डीटेल्स एखाद्या ठगाच्या हाती लागले तर तुमचं अकाऊंट रिकामं झालंच  म्हणून समजा. सध्या लोक थोडे शहाणे झाले आहेत, ते सहसा कोणाला आपले डीटेल्स सांगत नाहीत. म्हणून मग ठगांनी नवनवीन मार्ग शोधून काढले आहेत. हा किस्सा त्याचं चांगलं उदाहरण आहे.

१ डिसेंबरला एन. व्ही. शेख नावाच्या व्यक्तीने झोमॅटोवरून पिझ्झा मागवला होता. पिझ्झा यायला उशीर झाल्याने शेखने गुगलवरून झोमॅटोचा कस्टमरकेअर नंबर शोधून काढला. त्याने नंबरवर फोन करून आपली तक्रार नोंदवली. फोनवरच्या ‘ग्राहक सेवा प्रतिनिधी’ने त्याला सांगितलं कीकाही कारणांनी आम्ही तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही, तुमचे पैसे तुम्हाला परत केले जातील.’

यानंतर शेखला SMS वर एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवरून त्याला त्याचे PhonePe युझर नेम विचारण्यात आला आणि रिफंडची रक्कम विचारण्यात आली. त्याप्रमाणे शेखने आपली माहिती दिली. थोड्याच वेळाने त्याला SMS आला की त्याच्या बँक खात्यातून ४५,००० रुपये कमी करण्यात आले आहेत. शेखने घाबरून उरलेली रक्कम दुसऱ्या अकाऊंटला ट्रान्स्फर करायला घेतली, पण इतक्यात पुन्हा SMS आला. यावेळी त्याच्या खात्यातून ५०,००० रुपये गेले होते.

शेख म्हणतो की मी फक्त PhonePe युझर नेम दिलं होतं. त्यांनी माझ्या खात्यातून पैसे कसे लंपास केले माहित नाही.

नेमकं काय घडलं ?

नेमकं काय घडलं ?

मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही आम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे झोमॅटो आणि स्विग्गी यांचे कस्टमर केअर नंबर अस्तित्वात नाहीत. झोमॅटोच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार तुमच्या तक्रारी फक्त अॅपवर मांडायच्या असतात. 1800-120-2125 हा क्रमांक फक्त Interactive voice response पुरताच मर्यादित आहे.

ही माहिती सगळ्यांनाच माहित असते असं नाही. याचाच फायदा घेऊन अनेक चोरटे खोट्या नंबरच्या आधारे लोकांना फसवत असतात. zomato customer care असा सर्च केल्यावर तुम्हाला सहज झोमॅटोचा नंबर मिळेल.

तर मंडळी, तुम्ही कधी अशा खोट्या नंबरला बळी पडलेलात का? तुमचा अनुभव नक्की शेअर करा !!

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख