गेल्या एप्रिलमध्ये केंद्र सरकारनं स्मार्टफोन्सवरचा जीएसटी १२% वरून १८% पर्यंत वाढवला. त्यामुळं सगळयाच स्मार्टफोन्सच्या किंमतीत थोडी वाढ झाली. त्यात लॉकडाऊनमुळे स्मार्टफोन विक्रीही पूर्णपणे ठप्प झाली. पण आता लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यामुळे तुम्ही आता स्मार्टफोन खरेदी करू शकता मंडळी.
लॉकडाऊनमुळं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि आपल्या स्मार्टफोन विक्रीला परत गती देण्यासाठी स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या अनेक स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती बऱ्याच कमी केल्या आहेत. चला पाहूया त्यातील काही निवडक स्मार्टफोन्स...









