मागच्यावेळी आपण १० हजार रूपयांमध्ये मिळणारे बेस्ट स्मार्टफोन्स पाहिले होते. पण ज्यांचं बजेट थोडं जास्त, आणि ज्यांना थोड्या अधिक चांगल्या फिचर्सनी युक्त असा स्मार्टफोन घ्यायचाय, खास त्यांच्यासाठी आज आम्ही घेऊन आलोय हे लीस्टिकल. इथं आम्ही देतोय १० ते १५ हजार रूपयांमध्ये मिळणारे ५ असे स्मार्टफोन जे त्या किंमतीत सर्वोत्तम आणि पैसा वसूल ठरतात. हे पाहून तुम्ही ठरवू शकता की तुमच्या बजेटनुसार कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी 'बेस्ट डिल' ठरू शकतो.
जर तुम्ही चायनीज प्रोडक्ट म्हणून Realme, Redmi किंवा Vivo चे स्मार्टफोन्स न घेण्याचा विचार करत असाल तर आपण लक्षात घ्यायला हवं की या सर्व चायनीज कंपन्यांचे स्मार्टफोन बनवायचे कारखाने हे भारतातच आहेत. हे सर्व स्मार्टफोन्स 'मेड इन इंडिया' आहेत. सध्या तरी एकही भारतीय कंपनी या स्मार्टफोन बाजारात कार्यरत नाही. त्यामुळे अगदीच चीनी गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही Samsung या कोरीयन कंपनीचा विचार करू शकता.









