बिहारची ही शाळा फक्त एका मुलीसाठी सुरु आहे...कौतुक तर केलंच पाहिजे !!

लिस्टिकल
बिहारची ही शाळा फक्त एका मुलीसाठी सुरु आहे...कौतुक तर केलंच पाहिजे !!

फार पूर्वी जपानमध्ये केवळ एका मुलीसाठी रेल्वे धावायची. ही बातमी तुम्ही नक्कीच वाचली असणार. आज आम्ही भारतातल्या अशा एका शाळेबद्दल सांगणार आहोत जी केवळ एका मुलीसाठी सुरु आहे.

आम्ही बिहारच्या गया येथील सरकारी शाळेबद्दल बोलत आहोत. या शाळेत जान्हवी कुमारी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. ती पहिल्या इयत्तेत शिकते. तिच्यासाठी शाळेत २ शिक्षक आहेत, तर दुपारच्या जेवणासाठी एक स्वयंपाकी आहे. स्वयंपाकी नसेल तर हॉटेलमधून जेवण आणलं जातं.

खरं तर शाळेच्या पटावर ९ विद्यार्थी आहेत, पण फक्त जान्हवीच तेवढी शाळेत येते. तिच्या शिकण्याची जिद्द कौतुकास्पद आहे. शाळेचे शिक्षकही तेवढेच कौतुकास पात्र आहेत. प्रियांका कुमारी या शाळेतील शिक्षिका म्हणतात की ‘जान्हवीचा अभ्यासाच्या दिशेने असलेला ओढा पाहून आम्हाला आनंद होतो. तिला  योग्य शिक्षण मिळावं यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती पणाला लावत आहोत.”

तुम्हाला वाटेल की या भागात शिक्षणाचा प्रसार नाही, पण गोष्ट थोडी वेगळी आहे. या भागातील लोक आपल्या मुलांना सरकारी शाळेपेक्षा खाजगी शाळेत टाकणं पसंत करतात. असं असलं तरी शाळा बंद झालेली नाही ही आशादायक बाब आहे.

काय म्हणाल या शाळेबद्दल ?

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख