सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. सोशल मीडियामुळे तुम्हाला जगाशी जोडून घेता येते. नविन माहिती मिळते. पण याच सोशल मीडियावर अनेक चुकीच्या गोष्टी पण घडतात. सोशल मीडियावर चुकीची माहिती देण्याचा प्रकार पण मोठा आहे. इथे एखाद्या विषयावर बोलायला त्या विषयावर अभ्यास असणे गरजेचे नाही. सध्या सोशल मीडियावर कॉन्स्पिरसी थियरीजची चलती आहे. कॉन्स्पिरसी थियरीज म्हणजे काय? तर, आधी पारावर बसून लोक इकडच्या तिकडच्या गोष्टी एकत्र करून कुठलीही गोष्ट ढापुन द्यायचे असेच काहीसे. मग अशी गोष्ट जास्त लोकांपर्यंत पसरली की लोकांना खरे वाटायला लागायचे.
आज हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे सध्या अमेरिकेत नवी थियरी हिट होऊ पाहत आहे. ती म्हणजे पक्षी अस्तित्वात नसतात आणि आकाशात जे दिसतात ते लोकांवर लक्ष ठेवायला असणारे ड्रोन आहेत.






