रुई- या वनस्पतीबद्दल लहान मुलांच्या मनात सातत्याने धाक निर्माण केला जातो. रुईचा चिक विषारी असतो. त्याचा थेंब जरी डोळ्यात गेला तर अंधत्व येतं हे सतत ऐकल्यामुळे की काय रुईच्या सुंदर जांभळ्या फुलांकडे कोणीच लक्षच देत नाही. ते झुडूप कसंतरी आपलं अस्तित्व बागेच्या,अंगणाच्या कोपर्यात तगवत असतं. त्याच्या बोंडातून कापसाच्या म्हातार्या उडायला लागल्या की त्यांचा पाठलाग करत धावणं ही आठवण मात्र सगळ्यांना आवडती असते.
हे झालं लहानपणचं, थोडे मोठे झाल्यावर या वनस्पतीची आठवण होते थेट लग्नाच्या वेळीच! बर्याच घरात 'पंच पल्लव ' देवक असते. त्यामधील एक पल्लव म्हणजे रुई ! तसेही दर शनिवारी हा हार मारुतीला अर्पण करणारे अनेक भावीक आहेतच.







